आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण व स्वच्छ ऊर्जा सहकार्य:युरोप-भारत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे : राज्यपाल कोश्यारी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोप भारताचा महत्त्वाचा भागीदार असून भारत आणि युरोपीय देशांमध्ये पर्यावरण, संरक्षण व स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात मोठे सहकार्य सुरू आहे. युरोप जगातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असून भारताला देखील युरोपशी व्यापाराचा मोठा इतिहास आहे. या दोन्ही देशांमधील शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध देखील वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. भारत व युरोपीय समुदायांमधील संबंध स्थापन होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे शुक्रवारी मुंबईत ‘युरोप दिन २०२२’ साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...