आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Even After 70 Hours Have Passed After The Controversial Speech, The Governor Has Not Apologized, He Had Made A Statement About Shivaji Maharaj

राज्यपालांनी माफी मागितली नाहीच:शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त बोलून 70 तास उलटले, राज्यभरात शेकडो ठिकाणी आंदोलने

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला तब्बल ७० तास उलटून गेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात याविरोधात संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी शेकडो ठिकाणी आंदोलने केली. मात्र कोश्यारी यांनी अद्याप आपले वक्तव्य मागे घेतले नसून दिलगिरीही व्यक्त केली नाही.

राज्यपालांच्या विधानाचे पडसाद सोमवारी तिसऱ्या दिवशीही उमटत राहिले. १९ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डी.लिट. पदवी प्रदान सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले होते.

मुंबईत गिरगाव येथील चौपाटीवर शिवसेनेकडून राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांचे खोके बनवत ते समुद्रात फेकून निषेध व्यक्त केला. शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलनही केले. राष्ट्रवादीने सीएसएमटी परिसरात आंदोलन केले. राष्ट्रपतींना राष्ट्रवादी काँग्रेसने पत्र लिहिले असून राज्यपालांना परत बोलवावे, अशी विनंती केली. भाजपचे राज्यसभेतील खासदार व छत्रपतींचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी कोश्यारी यांची राज्यपालपदावरून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी केली.

आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांवर निष्ठा : गडकरी “छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. आई-वडिलांपेक्षाही जास्त छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचे जीवन आमचे आदर्श आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी.’ डीएड, बीएड करणारा राजा नव्हता. वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज एक महान राजे होते. -नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

बातम्या आणखी आहेत...