आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषकांचा सल्ला:अक्षयकुमारच्या सलग नऊ फ्लॉप चित्रपटांनंतरही सिनेसृष्टीला त्याच्या कमबॅकवर विश्वास

मुंबई / अमित कर्ण19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळापासून ते ‘सेल्फी’पर्यंत अक्षयकुमारच्या चित्रपटाची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याचे ‘बेलबॉटम’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ ‘रामसेतु’, ‘कटपुतली’, ‘अतरंगी रे’ ,‘लक्ष्मी’ आणि ‘कटपुतली’ फ्लॉप ठरले. इतके असूनही इंडस्ट्रीच्या दिग्गज ट्रेड विश्लेषकांनुसार, अक्षय पुन्हा पुनरागमन करेल. कारण यापूर्वीदेखील १९९५ पासून १९९९पर्यंत त्याचा काळ होता, त्यावेळी त्याचे एकापाठोपाठ एक असे ७ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यात ‘मैदान-ए-जंग’, ‘नजर के सामने’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘सपूत’, ‘लहू के दो रंग’, ‘दांव’, ‘आरजू’ आदीचा समावेश हाेता. तरीही त्याने तेथूनच भरारी घेतली आणि आज तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता झाला आहे. आता पुन्हा तेच ट्रेड विश्लेषक त्याच ‘हेराफेरी’च्या पुढच्या भागातून अक्षयच्या जोरदार कमबॅकची अपेक्षा करत आहेत.

“सेल्फी’सारख्या चित्रपटाचे बजेट कमी ठेवायला हवे : अमोद अमोद पुढे सांगतात...,”अक्षयने गेल्या वर्षभरात काही रिमेक केले असतील. त्यांचे मूळ चित्रपट हिट ठरले होते. अक्षय जेव्हा सलग अॅक्शन करत होता, तेव्हा लोक म्हणायचे कॉमेडी करावी. कॉमेडी करू लागला तेव्हा इतर जॉनरचे चित्रपट करावेत, अशी मागणी होऊ लागली. आता तो वेगळे चित्रपट करू लागला तेव्हा प्रत्येक वेळेस प्रयोग यशस्वी होतोच असे नाही. त्यामुळेच “सेल्फी’सारख्या चित्रपटाचे बजेट कमी ठेवायला हवे. काराण हा मल्याळी चित्रपटाचा रिमेक होता, त्याचे बजेट तेलुगू चित्रपटांपेक्षा कमी आहे.

वय पाहता पात्र निवडीविषयी गोंधळून गेलाय अक्षय अक्षयचे चित्रपट न चालण्यामागे आमोदने आणखी एक कारण सांगितले... ‘मला वाटतयं कदाचित अामचा हीरो आपल्या वयामुळे तर गोंधळून गेला नाही, एकीकडे वयानुसार भूमिका कराव्यात की यंग हीरोप्रमाणे खिलाडीच राहावे. या प्रकरणात अक्षयला स्वत:च निर्णय घ्यावा लागेल. अजय देवगणच्या बाबतीतही असेच आहे. त्याच्या ‘दृश्यम’मध्ये त्याच्याऐवजी दुसरे कोणी असते तर तो चालला असता. त्याचे बाकीचे ‘रनवे ३४’ आणि ‘थँक गॉड’ही चालले नाहीत.

‘सेल्फी’ची बुकिंग उघडली नसल्याने प्रेक्षकांपर्यंत संदेश गेला नाही गेटी गॅलेक्सीचे प्रमुख मनोज देसाई म्हणतात... ‘मी गेल्या ५१ वर्षांपासून वितरक म्हणून काम पाहतो. मधल्या काळात मी ‘खुदा गवाह’ हा चित्रपटही केला होता. तो पण चांगला चालला. मी अक्षयला सल्ला देईन की, त्यांनी वर्षात चार ते पाच चित्रपट करू नयेत. ते थोडे निवडक असावेत. अक्षय प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मला भेटतो, पण ‘सेल्फी’वर, त्याचा निर्माता करण जोहरने मला रिलीजच्या एक दिवस आधी बुकिंग उघडू दिली नाही. बुकिंग सुरू न झाल्यामुळे कदाचित चित्रपट चांगला नसल्याचा संदेश प्रेक्षकांमध्ये गेला.

‘पठाण’मुळे ‘सेल्फी’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन फिके : अतुल मोहन मात्र, ‘हेरा फेरी ४’चे शूटिंग मार्चच्या मध्यापासून सुरू होणार आहे. व्यापार पंडित अतुल मोहन म्हणतात... आताच याची घोषणा झाली. शूटिंगला दोन आठवडे उशीर झाला. कारण मोठ्या स्टार्सच्या तारखांचा मुद्दा येतो. ‘सेल्फी’च्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, ‘पठाण’सारख्या ब्लॉकबस्टरनंतर येणाऱ्या बिग बजेट चित्रपटांचे कलेक्शन थंडच राहते. ‘पठाण’ आणि ‘भोला’च्या रिलीजमध्ये अंतर आहे. अजयच्या चित्रपटाला चांगला प्रेक्षक मिळेल,आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...