आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे नेते नितीशकुमार ११ मे रोजी मुंबईत येणार आहेत. या माेहिमेत उद्धवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र या पक्षाचे नेतेच एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात अडकल्याने आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या भूमिकेवर दोन्ही काँग्रेसची तीव्र नाराजी आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केले. आता थेट शरद पवारांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे हा वाद टोकाला पोहोचला आहे.
राष्ट्रवादीने आघाडीतून जावे अशी राऊतांची इच्छा अाहे का?
राष्ट्रवादीत नेतृत्व करण्यास अनेक नेते समर्थ आहेत. तरीही मनभेद निर्माण करणारी वक्तव्ये करून आमच्या पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी संजय राऊत यांची इच्छा आहे का? - छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते
राष्ट्रवादीत वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी
शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी. पण त्यांच्या पक्षाचा शेंडा-बुडखा महाराष्ट्रात. त्यांच्या नेत्यांना जे हवे ते इथेच. म्हणून हा पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरलेत. - संजय राऊत (मुखपत्रातून)
यापूर्वी अजित पवार, नाना पटोलेंनीही घेतला होता समाचार
केंद्रीय यंत्रणांचा दबाव असल्यामुळे राष्ट्रवादीचे काही नेते भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. तेव्हा अजित पवारांनी ‘तुम्ही आमचे प्रवक्ते आहात का?’ असे त्यांना खडसावले होते. तर राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राऊतांचा नाना पटोले यांनी ‘चोंबडेपणा बंद करा’ अशा शब्दांत समाचार घेतला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.