आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तुफान पाऊस:​​​​​​​मंत्रालयासमोरही साचले पाणी, आयुष्यात पहिल्यांदा या ठिकाणी एवढे पाणी साचल्याचे पाहतोय म्हणत शरद पवारही आश्चर्यचकीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धोधो पाऊस कोसळत आहे. मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईकर हैराण आहे. मुंबईतील अनेक ठिकाणांवर पाणी साचल्याचे चित्र आहे. यावेळी मंत्रालयासमोरही पहिल्यांदाच पाणी साचले. येथे पाणी साचल्याचे पाहिल्यानंतर स्वतः शरद पवारही अचंबित झाले आहे. आयुष्यात पहिल्यांदा या ठिकाणी एवढे पाणी साचल्याचे पाहतोय असे म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार गाडीमधून प्रवास करत होते. तेव्हा मंत्रालयासमोरुन जात असताना सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाइव्ह केले. यामध्ये शरद पवारही बोलताना दिसत आहे. याच वेळी त्यांनी या पावसाविषयी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव आणि मुंबईत जोरदार पाऊस असूनही शरद पवार काम करत आहे. काल संध्याकाळी मंत्रालयासमोरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक होती.

या बैठकीला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. ही बैठक आटोपून रात्री पवार आणि सुप्रिया सुळे हे घरी जायला निघाले.त्याच वेळी सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाइव्ह करत मुंबईतील परिस्थिती दाखवली. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून पवारांची गाडी बाहेर पडून एअर इंडियाच्या दिशेने निघाली. यावेळी मंत्रालयासमोर प्रचंड पाणी साचले होते. पूरस्थिती झाल्याचे चित्र दिसले.

बुधवारी मुंबईचा पाऊस वादळाच्या दिवसापेक्षा अधिक धोकादायक दिसत होता. 46 वर्षांनंतर ऑगस्टमध्ये 12 तासांत कुलाबामध्ये 294 मिमी पाऊस पडला. यामुळे अनेक वर्षांनी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर बरेच पाणी साचले. ऑगस्टमध्ये 1974 मध्ये कुलाबात सर्वाधिक 262 मिमी पाऊस पडला होता. तर बुधवारी 293.8 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस बुधवारी आणखी वाढला. जोरदार वारे आणि पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले.

बातम्या आणखी आहेत...