आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीसाठी आतापर्यंत आलेल्या निकालांमधून कॉर्पोरेट क्षेत्राचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. महागाई आणि वाढत्या व्याजदरांमुळे आव्हानात्मक स्थितीत अर्ध्यापेक्षा जास्त कंपन्यांनी निकाल घोषित केले आहेत. त्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त कंपन्यांचा नफा अपेक्षेनुसार किंवा त्यापेक्षा जास्त राहिला. यामध्ये बँका आणि ऑटोमोबाइल कंपन्यांची कामगिरी सर्वात चांगली राहिली.
फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीसाठी आतापर्यंत ज्या कंपन्यांनी निकाल जाहीर केले त्यापैकी ६८% कंपन्यांचा नफा बाजारपेठेच्या अपेक्षेनुसार किंवा त्यापेक्षा जास्त राहिला. त्यातही बीएफएसआय (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस व विमा), ऑटो आणि सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी इतरांपेक्षा चांगली कामगिरी केली. मेटल कंपन्यांचा नफा घटला आहे, तर आयटी आणि ऑइल-गॅस कंपन्यांचा नफा जवळपास स्थिर राहिला. एफएमसीजी कंपन्यांत एचयूएलचा नफा १७% वाढला. ग्रामीण भागात कमकुवत वसुली या क्षेत्राचा कमकुवत दुवा आहे.
सरकारी बँकांची कामगिरी सर्वात चांगली : अहवालानुसार, बँकांचा नफा आणि अॅसेट क्वालिटीत सुधारणा झाली. सरकारी बँका याबाबतीत सर्वात पुढे आहेत. यामुळे गेल्या एक महिन्यापासून स्टॉक एक्स्चेंजवर सरकारी बँकांचे शेअर चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे मूल्यांकनही नेहमी उच्च स्तरावर पोहोचत आहे.
अहवालात मोतीलाल ओसवालच्या विश्लेषकांनी लिहिले, ‘अर्थव्यवस्थेतील कमजोरीमुळे चिंता वाढत आहे. बहुतांश कंपनी व्यवस्थापनांचे म्हणणे आहे की, आमच्या व्यवसायावर याचा कोणताच परिणाम होणार नाही. गत तिमाहीत बहुतांश कंपन्यांनी चांगले करार केले आणि त्यांची ऑर्डर बुक चांगली आहे.’
यांचा नफा जास्त वाढला
बजाज फायनान्स 159%
मारुती सुझुकी 130%
अॅक्सिस बँक 91%
एशियन पेंट्स 85%
एचडीएफसी 70%
यांचा नफा जास्त घटला
टाटा मोटर्स घाटा जेएसडब्ल्यू स्टील -86% श्री सिमेंट -52% विप्रो -21% टेक महिंद्रा -16%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.