आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Everyone In Maharashtra Needs To Be Vaccinated; Allow Purchase Of Vaccines, MNS President Raj Thackeray Wrote A Letter To Prime Minister Modi

मागणी:महाराष्ट्रातील सर्वांचेच लसीकरण गरजेचे; लस खरेदीची परवानगी द्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिले पंतप्रधान मोदी यांना पत्र

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज यांनी 13 एप्रिल रोजी सदर दोनपानी पंतप्रधानांना पत्र पाठवलेे आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात झाले आहेत. लॉकडाऊनचा आर्थिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. म्हणून कोरोना संसर्गाला समर्थपणे तोंड द्यायचे असेल तर महाराष्ट्रातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण अत्यावश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वयोगटांतील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

राज यांनी १३ एप्रिल रोजी सदर दोनपानी पंतप्रधानांना पत्र पाठवलेे आहे. पत्र मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत स्वतंत्रपणे आहे. त्यात राज म्हणतात, कोरोनाची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही उमटलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नाहीत. मात्र, राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो, असा सवालही राज यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर शंभर टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी कळीची आहे. म्हणूनच सर्व वयोगटांतील शंभर टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी, असेही राज यांनी नमूद केले आहे.

सीरमला मुक्तपणे लस विक्रीची परवानगी द्या
महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या. राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात. ‘सीरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी. लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशा मागण्या राज यांनी पत्रात केल्या आहेत. कोरोनावर उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...