आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सुकता:मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले विद्यमान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून त्याची उत्सुकता आहे. यासंदर्भात विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद, पूर्ण केलेल्या कामांचा त्यांनी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) आढावा घेतला. विभागाच्या नावीन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना केल्या.

वार्षिक योजना सन २०२३-२४ च्या आखणीसंदर्भात मंत्रालयीन विभागस्तरीय बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. या वेळी विविध विभागांच्या कामांचा व मागण्यांसंदर्भात फडणवीस यांनी आढावा घेतला. फडणवीस यंदा प्रथमच अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्पावर फडणवीस यांनी एक पुस्तिका लिहिलेली आहे. सध्या मध्यावधी निवडणुका केव्हाही होतील अशी राज्यात स्थिती आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प राजकीय असेल, लोकांना खुश करण्याचा प्रयत्न असेल.

२७ फेब्रुवारीपासून अधिवेशन मागच्या वर्षी ४ लाख २७ हजार ७८० कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला होता. दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे राज्याच्या उत्पन्न व खर्चाला मर्यादा पडल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाची सर्वांना उत्सुकता आहे. २७ फेब्रुवारीपासून मुंबईत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...