आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडणेकरांचे शहांना उत्तर:कोण कुणाला धोका देतोय, हे सर्वांना माहिती; खोके देते बोके कुणी पळवले, हे जनतेला समजले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोण कुणाला धोका देतोय हे सर्वांना माहिती आहे. खोके देते बोके कुणी पळवले हे जनतेला समजले आहे, असे उत्तर सोमवारी शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा यांना दिले.

पेडणेकर म्हणाल्या की, जनतेला त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. त्यासाठी त्यांना कोण बोलते तर शिवसेनेचे शाखा प्रमुख, कार्यालयीन प्रमुख हे आजही शाखेत असतात. तिथे महिला गटप्रमुखही उपस्थित असतात आणि ते मुंबईकर जनतेच्या समस्या समजून घेत काम करतात. त्यामुळे जनतेला कोण कुणाला धोका देतोय, कोण कुणाचे बोके खोके देऊन् पळवतोय असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

शिवसेनेचा नारा दीडशेचा

पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेनेचा पहिला नारा 150 चा आहे. प्रत्येक जण प्रत्येक जण त्यांची वेगवेगळी कॉपी करतंय का हे मला माहिती नाही. भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांनी काय सांगावे आणि मुंबईमधील वास्तव काय आहे यालाही जमीन आणि अस्मान आहे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

सावंतांची टीका योग्यच

उद्धव ठाकरेंसोबत ज्या बैठकी झाल्या त्याबद्दल सगळ्यांना माहिती नसते. मात्र, तेव्हाच हे काही कास बोलेले नाहीत, यांना आता का आठवतंय, असे म्हणताना अरविंद सावंतांनी केलेली टीका अगदी योग्य आहे, गजनी सारखे त्यांना आता आठवले का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे मनसुबे हाणून पाडू

पेडणेकर म्हणाल्या, भाजपचे छुपे मनसुबे सर्वांना समजले आहेत. प्रादेशिक पक्षांना संपवत केवळ देशात एकच पक्ष ठेवायचा हा भाजपचा मनसुबा कधीही पूर्ण होणार नाही, असे सांगताना स्थानिक पक्ष त्या त्या ठिकाणी जनतेशी नाळ जोडून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे सर्व आपल्याला आगामी निवडणुकीत दिसेल असेही किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे. आम्ही जमिनीवरच आहोत, तुम्हाला आता जमीनीवर आणू असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला.

बातम्या आणखी आहेत...