आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगा वाद:शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी; छगन भुजबळांचे आवाहन

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जुना व्हिडीओ ट्विट केल्यानंतर राज यांच्यावर छगन भुजबळांनी निशाणा साधला आहे. शिवसेना सत्ते असताना उद्धवपेक्षा राज क्रियाशिल होते त्यांनी दुसरे काही करण्यापेक्षा त्यातच लक्ष देत बाळासाहेबांचा शब्द पाळला असता तर..अशा शब्दात त्यांना टोला लगावला.

बाळासाहेबांच्या त्या भाषणानंतर 1995 मध्ये शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त राज ठाकरे क्रियाशील होते. त्यावेळी राजसाहेबांनी दुसरे काही करण्यापेक्षा त्यात लक्ष घातले असे तर बाळासाहेबांचा शब्द पाळता आला असता, असा टोला भुजबळ यांनी राज ठाकरेंना लगावला. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया -
छगन भुजबळ यांनी आज इम्पेरिकल डाटा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. आपण केलेल्या कायद्यासारखाच समांतर कायदा मध्य प्रदेश राज्यात सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यांमध्ये जाहीर करा. यासंदर्भात आम्ही वकिलांशी चर्चा करत आहोत आणि योग्य अभ्यास करून राज्य सरकार पुढील पावले टाकेल, असे भुजबळ यांनी सांगितले.

सकारात्मक विचार करूया -
आपले पंतप्रधान परदेशात जाऊन युद्ध संपावे यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्याच वेळेस महागाई व बेरोजगारी विरोधात आपल्या देशातील जनतेचे युद्ध सुरु आहे. त्याकडेही ते लक्ष देतील अशी माझी अपेक्षा आहे. आपणही शक्य होईल तितका त्यांच्याबाबत सकारात्मक विचार करूया,अशी खोचक टीका त्यांनी केली.

सामाजिक प्रश्नांवर आपण तोडगा काढला पाहिजे -
श्रीलंका आणि पाकिस्तानात महागाईचे मोठे संकट आहे. एक देश म्हणून आपण त्यांना मदत करत आहोत. अर्थात यामध्ये सर्वात मोठे श्रेय हे आपल्या बळीराजाला जाते. कारण त्याने केलेल्या मेहनतीच्या बळावर आपण शेजारील राष्ट्रांची मदत करु शकत आहोत. मात्र, अशी परिस्थिती जगामध्ये निर्माण होत असताना आपल्या देशामध्ये शांतता राखून, सगळ्यांना बरोबर घेऊन आपण आपल्या लोकांचे संरक्षण केले पाहिजे. विविध सामाजिक प्रश्नांवर आपण तोडगा काढला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...