आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांना मोठा दिलासा:लोकल ट्रेनमध्ये शुक्रवारपासून सर्वांना करता येणार प्रवास, पश्चिम रेल्वेने गाड्यांची संख्या वाढवण्याचे दिले संकेत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारपासून पश्चिम मार्गावर धावतील 1367 लोकल ट्रेन

29 जानेवारी शुक्रवारपासून सामान्य लोकांनाही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली जाऊ शकते. सुत्रांनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीनंतर यावर निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रेल्वेकडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही.

शुक्रवापासून पश्चिम मार्गावर धावतील 1367 लोकल ट्रेन

पश्चिम रेल्वे शुक्रवारपासून 1,201 लोकल गाड्यांची संख्या वाढवून 1,367 करणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. यानंतर सामान्य नागरिकांना यामध्ये प्रवास करता येईल असे मानले जात आहे. यापूर्वी केवळ आवश्यक सेवांशी संबंधित लोक आणि स्त्रियांना यात प्रवास करण्यास परवानगी होती. मध्य रेल्वेत सध्या 1,580 लोकल ट्रेन धावत आहेत. तर सामान्य दिवसांत मध्य रेल्वेवर 1774 लोकल गाड्या धावतात.

मुख्यमंत्र्यांसमवेत या लोकांची बैठक झाली

सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्य सचिव विकास खरगे, सचिव आबासाहेब जराड, बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल, पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आलोक कंसल, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आता मुंबईत केवळ 20 लाख लोक करताहेत प्रवास

एका रिपोर्टनुसार, लोकल ट्रेनमधून मुंबईत दररोज सुमारे 80 लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु कोरोना काळात प्रतिबंध लावल्यानंतर यावेळी ही संख्या कमी होऊन 20 लाख झाली आहे. COVID-19 महामारीमुळे 6 महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर लोकल सेवा जूनमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...