आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे धर्मवीरच:105 वर्षांपासूनचे पुरावे; स्वराज्यरक्षक टायटल मार्केटेबल, लेखक विश्वास पाटील यांची वादात उडी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाआधी ‘धर्मवीर’ उपाधी लावायची की ‘स्वराज्यरक्षक’ यावरून महाराष्ट्रात मोठे वादंग निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वप्रथम ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते’ असा दावा केला. त्याला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केल्यामुळे हा विषय पेटला.

आता प्रसिद्ध साहित्यिक, ‘संभाजी’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी वादात उडी घेतली. राजांचा धर्मवीर असाच उल्लेख होत असल्याचे १०५ वर्षांपासून पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला. डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल वापरले. त्याआधी या शब्दाचा कुठेही उल्लेख झालेला नाही. मतांच्या आशेने राजकारण बदलता येईल, पण सत्य इतिहास कुणालाही बदलता येणार नाही, असेही विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले.

‘संभाजी’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी दिलेले पुरावे
१९१७ मध्ये नाटककार, कादंबरीकार नाथमाधव यांनी संभाजीराजांवर “मराठ्यांचा आत्मयज्ञ’ नाटक लिहिले. त्यात सर्वप्रथम त्यांनी राजांसाठी ‘धर्मवीर’ या उपाधीचा उल्लेख केला.
१९२९ मध्ये कृ. बा. भोसले यांनी “रक्तरंगण” नाटक लिहिले. त्यातही त्यांनी संभाजीराजांचा ‘धर्मवीर’ उपाधीनेच सन्मानपूर्वक उल्लेख केला.
१९२९ मध्ये प्रसिद्ध शाहीर पांडुरंग खाडिलकर यांनी “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या शीर्षकानेच पोवाडा लिहिला होता. तोही त्या काळी महाराष्ट्रातील गावागावात गाजला.
१९४१ मध्ये ग. कृ. बोडस यांनी “धर्मवीर संभाजी’ नाटक लिहिले. त्याचे गावागावात प्रयोग झाले, तेव्हापासून राजांची ही उपाधी महाराष्ट्रभर पसरली.

डॉ. अमोल कोल्हे : छत्रपतींना रोजच्या राजकारणात आणू नका
खा. डॉ. अमोल कोल्हे : विश्वासरावांना काही सांगावे इतका मी मोठा नाही. आम्ही दोघे एकाच दिशेने जात आहोत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचीही गरज नाही. अशा वादामुळे छत्रपतींचे कार्यकर्तृत्व झाकोळण्यापेक्षा त्यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. रोजच्या राजकारणात छत्रपतींना आणू नका. त्यांना दिलेली उपमाही इतर नेत्यांना देऊ नये.

फडणवीस : छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : छत्रपती शिवाजी महाराज हेच देशात एकमेव जाणते राजेे. इतरांना ही उपाधी कुणी देत असल्यास देऊ द्या, पण जनता मात्र तसे मानणार नाही. संभाजीराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोहच.

छगन भुजबळ : शरद पवारांनी आयुष्यात विद्यापीठ नामांतरांसह अनेक सामाजिक कामे केलीत. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे?

बातम्या आणखी आहेत...