आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Cyrus Mistry Death Accident | Ex Chairman Of 'Tata' Cyrus Mistry Dies In An Accident In Palghar, The Car Hit The Road Divider While Avoiding A Pothole

अपघात:‘टाटा’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये अपघातात मृत्यू, खड्डा चुकवताना रस्ते दुभाजकाला धडकली कार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (५४) यांचे रविवारी कार अपघातात निधन झाले. अहमदाबाद येथून मुंबईकडे मर्सिडीज गाडीतून येत असताना पालघर जिल्ह्यातील चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीवरील पुलाच्या अगोदरचा खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले. ही भरधाव कार नदीवर असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातामध्ये वाहनामधील एअर बॅगा उघडल्या, मात्र डोक्याला जबर मार लागल्याने मिस्त्री हे जागीच मृत पावले, असे पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. मिस्त्री अन्य तीन मित्रांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत होते. अपघातात दोघे जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची सखोल चौकशी करा : फडणवीस यांचे आदेश
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या गाडीला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना दिले आहेत. ज्या परिसरात अपघात घडला त्या राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी परिसरात जानेवारी २०२२ पासून तब्बल छोटेमोठे १९६ अपघात झाले असून त्यामध्ये ७८ प्रवाशांचा जीव गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सायरस मिस्त्री यांची एकूण संपत्ती ८० हजार कोटी रुपये
-डिसेंबर २०१२ मध्ये रतन टाटांच्या निवृत्तीनंतर मिस्त्री टाटाचे चेअरमन झाले. मात्र, २४ ऑक्टोबर २०१६ ला त्यांना पदावरून हटवण्यात आले.
-सायरस यांची एकूण संपत्ती ८० हजार कोटी आहे. टाटा समूहात टाटा ट्रस्टनंतर सर्वाधिक १८.५ टक्के शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत.
-सायरस यांना कारची आवड होती. वाचनाचा छंद होता. ते पार्ट्यांपासून कायम दूर राहत.
- सायरस यांच्या पश्चात पत्नी रोहिका, दोन मुले फिरोज, जहान व भाऊ उद्योगपती शापूरजी आहेत.

सायरस मिस्त्री यांचे निधन:सायरस यांना एसयूव्ही कारची खूप आवड होती, पुस्तक वाचन-गोल्फमध्ये रमत, पार्ट्यांपासून दूर

बातम्या आणखी आहेत...