आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांनी हा अर्ज केला हाेता. काेर्टाच्या निर्णयामुळे आता मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. परंतु ईडीने त्यांच्यावर ३ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत कारवाई करू नये, असे न्यायालयाने ईडीला निर्देश दिले आहेत. त्यामुळे माजी मंत्र्यांना तीनदिवसांचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. सरसेनापती संताजी घाेरपडे साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. मुश्रीफ यांनी कामगारमंत्री असताना काेल्हापुरात संताजी घाेरपडे साखर कारखाना सुरू केला. त्यासाठी शेतकऱ्यांना शेअर्सचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गाेळा केले हाेते. ते पैसे मुश्रीफ यांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा आराेप आहे. २०११ मध्ये मुश्रीफ यांनी शेअर्सच्या नावाखाली शेतकऱ्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेतले हाेते, असे ईडीचे म्हणणे आहे.
हायकाेर्टात जाणार गैरव्यवहार प्रकरणातील मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. काेर्टाने निकाल राखून ठेवला आहे. परंतु त्याआधी अर्ज फेटाळल्याने अडचणींत वाढ झाली आहे. नंतर सत्र न्यायालयाच्या निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुश्रीफ यांच्या वकिलांनी दाेन आठवड्यांचा अवधीही मागितला. त्यात हायकाेर्टाचा निकाल येईपर्यंत सत्र न्यायालयाच्या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.