आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव महानगर पालिका निकाल:संजय राऊत पुन्हा तोंडावर पडले; माजी खासदार नीलेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले संजय राऊत?

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दीक टीका टीप्पणी सुरु आहे. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला होता. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राणे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विट करत राऊत यांचा चिमटा काढला.

माजी खासदार नीलेश राणे यांनी बेळगाव निवडणुकीत जिंकलेल्या पक्षांची आकडेवारी दिली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. संजय राऊत आणि शिवसेना पुन्हा तोंडावर पडले, तुमची पात्रता काय आणि तुम्ही बोलता किती अशी बोचरी टीका राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

काय म्हणाले संजय राऊत?
बेळगाव मनपा निवडणुकीच्या निकालावरुन राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा पक्ष जिंकलाय पण मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली 69 मराठी माणसांनी हौतात्म्य दिले आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या अस्मितेसाठी तुरंगात गेले आहे. परंतु, तुम्ही राज्यात पेढे वाटता लाट वाटायला पाहिजे. यासाठी मराठी माणूस कदापीही माफ करणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

बेळगावमधील पराभवामागे मोठे कारस्थान - संजय राऊतांना संशय
संजय राऊत बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने भाजपला जोरदार धडक दिली. दरम्यान, या निवडणुकीत एकीकरण समितीला मोठे यश मिळेल असे वाटत होते. परंतु, एकीकरण समितीला केवळ 3 जागा मिळाल्याने या पराभवामागे मोठे कारस्थान असल्याची शंका राऊतांनी यावेळी उपस्थित केली. बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये यासाठी कर्नाटक सरकारने मोठी गडबड केली आहे. यासंदर्भांतील माहिती लवकरच समोर येईल असेही राऊत यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...