आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मद्य विक्री:कंटेनमेंट झोन वगळता घरपोच मिळेल मद्य, राज्य सरकारने घेतला निर्णय, औरंगाबादेत मात्र दारू मिळणार नाहीच

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अशा आहेत अटी-शर्ती : फक्त परमिटधारकालाच मिळेल मद्य

मद्य खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारपासून (१४ मे) घरपोच मद्य देण्याचा निर्णय घेतला आहे. कंटेनमेंट झोन वगळता सर्व ठिकाणी मद्य विक्रेत्यांना सशर्त घरपोच मद्य देण्याची परवानगी आहे.  सरकार हा निर्णय रद्द किंवा यात बदलही करू शकेल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. आैरंगाबादेत मद्यविक्री बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

अशा आहेत अटी-शर्ती : फक्त परमिटधारकालाच मिळेल मद्य

- डिलिव्हरी बॉयच्या फिटनेसची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करून त्याला ओळखपत्र दिले जाईल. 

- मद्य विक्रेत्यांनी उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधल्यानंतरच मद्य घरपोच देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

- नमूद केलेल्या दिवशी आणि वेळेवर विदेशी मद्याची विक्री आणि वितरण केवळ त्याच्या परिसरात करू शकणार आहेत.

- फक्त परमिटधारकालाच मद्य मिळेल. मागणी केल्यानंतर त्याच्या निवासी पत्त्यावर मद्य पोहोचवावे लागणार आहे.

- डिलिव्हरी बॉयनी मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करावा.

बातम्या आणखी आहेत...