आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षा रद्द:अंतिम सत्रातील परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्षात प्रवेश; उदय सामंत यांची घोषणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा 1 ते 31 जुलै दरम्यान होऊ शकतात'

पदवीतील शेवटच्या वर्षातील शेवटच्या सेमीस्टर सोडून इतर सर्व सेमीस्टरच्या परीक्षा रद्द करण्याच आल्या आहेत. अशी माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यामुळे कॉलेज विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उदय सामंत यावेळी म्हणाले की, पदवीच्या अंतिम परीक्षा घेतल्या जातील. बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. परंतू, नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार सर्व निर्णय घेण्यात येत असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा 1 ते 31 जुलै दरम्यान घेतल्या जातील. पण, लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 20 जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असे सामंत म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...