आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राहकांना शॉक:लाॅकडाऊन काळातील भरमसाठ दरवाढ वीज बिलास कारणीभूत

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 युनिटच्या आतील ग्राहकांना 16 टक्के वाढीचा फटका

१ एप्रिल रोजी राज्यात वीज दरवाढ झाली. पण, लाॅकडाऊनमुळे ती समजली नाही. आता आलेल्या बिलांत अडीच महिने जादा वीज दराचे आहेत. ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण, दरवाढ माहीत नसल्याने बिले चुकीची आल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट करत ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात असंतोष प्रकट करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे (जि. कोल्हापूर) यांनी केले आहे.

जून महिन्याची वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आली आहेत. होगाडे म्हणाले, १ एप्रिल पासून वीज दरवाढ केली. त्यापूर्वी स्थिर आकार दरमहा ९० रुपये होता, तो १०० रुपये झाला. वहन आकार १.२८ रु. प्रति युनिट होता, तो १.४५ रु. प्रति युनिट झाला. वीज आकार पहिल्या १०० युनिटस साठी ३.०५ रु. प्रति युनिट होता. तो ३.४६ रु. प्रति युनिट केला. १०० युनिटसच्या पुढील १०१ ते ३०० युनिटस पर्यंतचा दर पूर्वी ६.९५ रु. प्रति युनिट होता, तो आता ७.४३ रुपये प्रति युनिट झाला. ३०० युनिट्सच्या पुढील ३०१ ते ५०० युनिटस पर्यंतचा दर पूर्वी ९.९० रुपये प्रति युनिट होता, तो १०.३२ रुपये प्रति युनिट झाला आहे.

एकूण वाढ १०० युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी १६% आहे व १०० युनिटसच्या वरील ग्राहकांसाठी सरासरी दरवाढ १३% आहे. राज्यातील अंदाजे २ कोटी घरगुती वीज ग्राहकांना बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आली आहेत. २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असताना विद्युत नियामक आयोगाने ३० मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर केला. १ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होतील, असे जाहीर केले. महावितरण कंपनीच्या बिलांचा प्रोग्राम बरोबर आहे. स्थानिक कार्यालय फक्त मीटर रीडिंगचा आकडा व रीडिंगची तारीख देते. ग्राहक क्रमांकानुसार माहिती भरते. यामध्ये काही चूक झाली, तर चुकीचे बिल येते. पण, अशा बिलांचे प्रमाण अल्प आहे. अशा ग्राहकांनी लेखी तक्रार करावी.

ग्राहकांनी बिले दुरुस्त करून घ्यावी

फेब्रुवारी २०२० चा म्हणून दाखविलेला पण चुकीचा अवाढव्य इंधन समायोजन आकार १.०५ रुपये प्रति युनिट मूळ सरासरी देयक दरात समाविष्ट केला. त्यामुळे २०१९-२० चा सरासरी देयक दर ६.८५ रुपये प्रति युनिट ऐवजी ७.९० रुपये प्रति युनिट गृहीत धरला. हा देयक दर ७.९० रुपये वरून ७.३१ रुपये प्रति युनिटवर आणला म्हणजे दरकपात केली असे दाखविले गेले. प्रत्यक्षात सरासरी देयक दर ६.८५ रुपये प्रति युनिट वरून ७.३१ रुपये प्रति युनिट याप्रमाणे वाढविण्यात आला. ही दरवाढ ०.४६ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ६.७% होते, असे होगाडे यांनी सांगितले.    

बातम्या आणखी आहेत...