आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेन हत्येच्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माचा सहभाग असल्याचा आणि पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेने हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात वाझे आणि शर्मासोबतच्या संबंधांचा खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
उपाध्ये म्हणाले, मनसुख हिरेन यांची हत्या करण्याच्या कटाची आखणी पोलिस आयुक्तालयात झाल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुद्धा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे, असे उपाध्ये म्हणाले. हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलिस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे, असे उपाध्ये म्हणाले.
भूखंड विक्रीत एक हजार कोटींचा घोटाळा : शेलार
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत समुद्रकिनारी असलेला १ एकर ५ गुंठे आकाराचा शासकीय मालकीचा भूखंड रुस्तमजी बिल्डराला कवडीमोल किमतीत विकला. या भूखंड विक्रीत १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या व्यवहाराला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून कुणाचे आशीर्वाद आहेत, असा सवाल आ. आशिष शेलार यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.