आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकल स्पोट:पालघरधील केमिकल फॅक्टरीत स्फोट; 10 किमी अंतरावर ऐकू आला स्फोटाचा आवाज, एकाचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तारापूर इंडस्ट्रियल एरियातील केमिकल फॅक्टरीत हा स्पोट झाला, 4 जखमी
  • जानेवारीमध्ये येथील एका फॅक्टरीत झालेल्या स्पोटात 7 जणांचा मृत्यू झालो होता

मुंबईजवळील पालघरमध्ये सोमवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना झाली. येथील तारापूर इंडस्ट्रियल एरियातील एका केमिकल फॅक्टरीत मोठा स्पोट झाला. पालघरचे कलेक्टर कैलाश शिंदे यांनी सांगितले की, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर चौघे जखमी झालेत.

या स्पोटाचा आवाज 10 किलोमीटर दूर असलेल्या सालवाड, पाथल, बोईसर, तारापूर आणि आसपासच्या गावापर्यंत ऐकू गेला. काही रिपोर्ट्सनुसार, या स्पोटानंतर अनेक किमीपर्यंत गॅस गळती झाली आहे. केमिकल रिएक्शनमुळे हा स्पोट झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

जानेवारीमध्येही झालेल्या स्पोटात सात जणांचा मृत्यू झालो हाता

या वर्षी जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील कोलवाडे गावातील केमिकल फॅक्टरीत स्पोट झाला होता. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर चौघे जखणी झाले होते. तो स्पोट केमिकल टेस्टिंगदरम्यान झाला होता.

बातम्या आणखी आहेत...