आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी मुदतवाढ:विधानसभा अध्यक्षांची सभागृहामध्ये माहिती

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी लेखी खुलासा सादर करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुदतवाढ देण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (८ मार्च) विधानसभेत केली. तर, नैसर्गिक न्यायतत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला असून दिलेल्या मुदतीत त्यांनी खुलासा न केल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी आमदार अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी हक्कभंग सूचना १ मार्च रोजी दिली. त्यानंतर यासंदर्भात लेखी खुलासा करण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी १ मार्चला नोटिसीद्वारे केली होती. त्या नोटिसीला राऊत यांनी ८ मार्च रोजी उत्तर देत मुदतवाढ मागितली होती.

बातम्या आणखी आहेत...