आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा, जे. पी. नड्डा सप्टेंबरमध्ये मुंबई दौऱ्यावर:रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागण्याची शक्यता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तांतरानंतर राज्यातील घडामोडींनी वेग घेतला आहे. महापालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबर लालबागच्या राजासह मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊनही अमित शहा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. तर जेपी नड्डाही 15 व 16 सप्टेंबरला गणेशोत्सवानिमित्त मुंबईत येत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर अमित शाह यांचा हा मुंबईचा पहिलाच दौरा असणार आहे. मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने मोठी रणनीति आखल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यात ते महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. शिवाय, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेत काय होणार

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या महापालिका निवडणुका होणार आहेत. शिंदे गट आणि भाजप ही निवडणूक एकत्रपणे लढवणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महापालिकेत काय होणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...