आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:गळफास घेताना फेसबुक लाइव्ह, पालघरमधील 22 वर्षीय तरुणाची पंख्याला लटकून आत्महत्या

पालघरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. या तरुणाचे नाव नवनाथ बोंगे असं आहे. त्याने असे का केले हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. नवनाथ हा वाडा तालुक्यामधील वीरा गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. जव्हारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवनाथ बोंगेने कॅमेरा सेट करुन आत्महत्या केली. पंख्याला दोरी बांधत तो स्टूलवर उभा राहिला. यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. नवनाथ हा जव्हार येथील एका हॉटेलमध्ये वेटर होता. दरम्यान तो हॉटेल मालकाच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्याने गुरुवारी फेसबुक लाइव्ह केलं आणि आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

व्हिडिओमध्ये नवनाथ हा रडताना दिसतोय. त्याने पंख्याला दोरी बांधली आणि कॅमेरा सेट करत आत्महत्या केली. हा सर्व थरार कॅमेरात कैद झाला. फेसबुक लाइव्ह सुरू असताना त्याला अनेक फोन येत होते. मात्र त्याने सर्व फोनकडे दुर्लक्ष करत कॅमेऱ्यात कैद होईल अशा प्रकारे आत्महत्या केली आहे. आत्महत्यादरम्यानचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून एकच खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...