आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्‍या सूचना:ऊसतोडणी कामगारांना सुविधा द्याव्यात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करावा. तसेच ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठक घेतली. त्यावेळी गोऱ्हे यांनी या सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...