आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात एका महिलेला मुख्यमंत्री बनवायला हवे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. आता मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मला या विषयावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्व अशा विषयांवर निर्णय घेतो. भाजपकडे आमदारांची संख्या जास्त असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. त्यामुळेच महिला मुख्यमंत्री करण्याच्या चर्चेवर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार. मात्र राज्याचे नेते म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आहे. या प्रकाराचे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले आहे.
जनतेला फडवीसांकडून मोठ्या अपेक्षा
राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण ते आमचे नेते आहेत. भाजपचे सर्व कार्यकर्ते फडणवीस यांना आपला नेता मानतात. अशा युक्तिवाद करत बावनकुळे यांनी भाजपमध्ये महिलेला मुख्यमंत्री करण्याची शक्यता अप्रत्यक्षपणे फेटाळून लावली आहे.
जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला हवी. गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा सुरू आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार स्व. राजीव सातव यांनी यासंदर्भात भाष्य केला होता. ‘मराठवाड्यातील आमची बहीण पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, ही आमची सर्वांची इच्छा आहे.’ एका कार्यक्रमात माजी खासदार स्व. सातव यांनी दिलेल्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनीही भाष्य केले. “मी मुख्यमंत्री होणार की नाही माहीत नाही. पण मी मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांमध्ये खळबळ पसरली होती. पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे राजकीय संबंध बिघडू लागले.
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची मोहीम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच त्यांना आता पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. या प्रकाराची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी नेहमीच स्पष्ट केले आहे की, त्यांना केंद्रीय राजकारणात राहायचे आहे आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.