आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलगिरी:'शाहू महाराजांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही', 'त्या' प्रकाराबद्दल फडणवीसांची दिलगिरी

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांकडे माफी मागण्याची मागणी केली होती

छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्याबद्दल खासदार संभाजीराजेंनी फडणवीसांकडे माफीची मागणी केली होती. त्यानंतर ट्वीट केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा काल स्मृतिदिन होता. यादिवशी देवेंद्र फडणवीसांनी शाहू महाराजांचा उल्लेख 'सामाजिक कार्यकर्ते' असा केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयी संतापाची लाट उमटली होती. त्यानंतर संभाजीराजेंनी फडणवीसांना माफी मागण्याची मागणी केली होती. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ''माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.'' अशी मागणी संभाजीराजेंनी केली. 

त्यानंतर ट्वीटरवरुन फडणवीसांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, ''छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.''

बातम्या आणखी आहेत...