आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशी:फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवडीची चाैकशी; 16 सदस्यीय समितीमध्ये भाजपचेही 4 आमदार!

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २५०० कोटी खर्च होऊनही २८ कोटी वृक्षांपैकी २५ टक्केच झाडे जिवंत

फडणवीस सरकारने राबवलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी १६ सर्वपक्षीय आमदारांच्या समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. तेच समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती येत्या चार महिन्यांत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करणार अाहे. २५०० कोटी खर्च होऊनही २८ कोटी वृक्षांपैकी २५ टक्केच झाडे जिवंत आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी सर्व आमदारांनी केली होती.

समिती पुढीलप्रमाणे : सदस्य :, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी किणीकर (सर्व शिवसेना), अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम (सर्व राष्ट्रवादी), नाना पटोले, सुभाष धोटे , अमित झनक, संग्राम थोपटे (सर्व काँग्रेस), आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर (सर्व भाजप) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष).

बातम्या आणखी आहेत...