आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहेत संजय राऊत?:फडणवीसांनी 'मविआ'ला फटकारले; दिवसा स्वप्न पाहू नका, आमचे एकही मत फुटणार नाही

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उभा केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी आगपाखड केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोण आहेत संजय राऊत, असा सवाल करीत दिवसा विजयाचे स्वप्न पाहू नका, आमचा एकही उमेदवार फुटणार नाही, असा टोला महाविकास आघाडीला लगावला. ते लातूर जिल्ह्यातील औसा येथे बोलत होते. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मनरेगातून ग्रामसमृद्धी हा उपक्रम राबवला आहे. यासाठी फडणवीस हे औसा येथे आले होते.

राज्यसभेसाठी जोरदार रस्सीखेच

राज्यात राज्यसभा निवडणूकांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने आपला तिसरा उमेदवार उतरवल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्यात. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप निवडणुकीसाठी घोडेबाजार करीत असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडणून येतील असा दावा केला. त्यावर फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तसेच राज्यसभा निवडणूकीत भाजपचे एकही मत फुटणार नाही, असे ठणकावून सांगितले.

राऊत तत्ववेत्ते आहेत का?

भाजपकडे एजन्सी आहे तर आमच्याकडे राज्य सरकार अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या या वक्तव्यावर कोण संजय राऊत, असा प्रति सवाल उपस्थित करत संजय राऊत फार तत्ववेत्ते आहेत का? ते दिवस भर उलटसुलट बोलत असतात, त्याच्या प्रश्नावर मी का उत्तर देऊ? असे म्हणत त्यांनी राऊतांनाही टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षात सर्वच नेते आहेत त्यांनी दिवसा स्वप्न बघू नये. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे एकही मत फुटणार नाही, असेही ते म्हणाले.

सोलापूर दौरा रद्द

विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौर रद्द करण्यात आला आहे. यानंतर फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. फडणवीसांची एकाएकी प्रकृती बिघडल्याने दौरा रद्द करावा लागले. यामुळे पुढील सर्व नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले, असेही सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...