आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन वझेंकडून मनसुख हिरेन यांची हत्या?:मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वझेंना अटक का झाली नाही? त्यांना कोण वाचवतोय? विधानसभेत फडणवीसांचा दावा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहा वाचून दाखवला

मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचे तक्रार अर्ज जशास तसे वाचून दाखवले. विमला हिरेन यांना संशय आहे, की एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केली. देवेंद्र फडणवीस यांनी हे वाचताच सभागृहात गदारोळ उडाला. तर सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यामुळे भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. अशात सभागृहाचे कामकाज 4 वेळा तहकूब कारावे लागले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचला. "माझ्या पतीची चौकशी वझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. एवढेच नव्हे तर हिरने यांची गाडीही चार महिने वझेंकडेची होती" असे हिरेन यांच्या पत्नी म्हणाल्या. "वझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वझे यांना कोण वाचवत आहे?" असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, "मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे 2017 चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचे नाव धनंजय विठ्ठल गावडे तर दुसऱ्याचे नाव सचिन हिंदुराव वझे असे आहे."

सचिन वझे कोणत्या पक्षाचे? त्यांना तत्काळ अटक करा
दरम्यान, सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस संतापले. सचिन वझे यांना तत्काळ अटक करा. सचिन वझेचे काय हे आम्हाला कळाले पाहिजे. सचिन वझे कोणत्या पक्षाचे होते? त्यांना मनसुख हिरेन प्रकरणी तत्काळ अटक करा. त्यांना पाठीशी का घातले जात आहे? असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.

बातम्या आणखी आहेत...