आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस म्‍हणाले:मला जेलमध्ये टाकण्याचे ठाकरे सरकारचे पाेलिस आयुक्तांना हाेते टार्गेट

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील, अजित पवार यांनी मात्र आरोप फेटाळले

गेल्या अडीच वर्षात फौजदारी गुन्हे दाखल करून मला अटक करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन होता. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडेंना तसे टार्गेट दिले होते. एकनाथ शिंदेंनाही याबाबत कल्पना होती. पण मी काहीच केलेले नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मंगळवारी ते बोलत होते. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या आरोपांचे खंडन केले. आमच्या सरकारने असा निर्णय घेतला नव्हता. गेल्या अडीच वर्षात असा विषयही कधी कानावर आला नाही, त्यांनी सांगितले. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘वळसे पाटील यांनी तशी तयारी केल्याचे माझे म्हणणे नाहीच. पण तसे आदेश ‘वरून’ आले होते, असे म्हणत फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

बातम्या आणखी आहेत...