आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद गुरुवारी (ता.२) विधानसभेतही उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र विधानसभेत दिसून आले. या निकालावरून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला पटोले यांनी फडणवीस यांना दिला, तर तीन राज्यांच्या निकालात काँग्रेस दिसतच नाही, त्याची काळजी तुम्ही करा, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी चढवला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशत मुंबईत सुरू आहे. आज पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल असल्याने सकाळपासून विधान भवनात यावरून चर्चा सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष निकालाकडे लागले होते. अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना कसब्याचा निकाल आल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.
चिंतन करावे लागेल : कुणाल टिळक भारतीय जनता पक्षाचा कसबा हा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला असताना यंदाच्या निवडणुकीत भाजपची हक्काची मते नेहमीच्या प्रभागातून इतरत्र का फिरली गेली याचा अभ्यास, चिंतन करावे लागणार अाहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मला अागामी काळात अधिक काम करावे लागणार असल्याची भावना स्वर्गीय अामदार मुक्ता टिळक यांचे पुत्र भाजप प्रवक्ते कुणाल टिळक यांनी व्यक्त केली.
कसब्यातील जनतेचा काैल स्वीकारताे ^कसबा विधानसभा पाेटनिवडणुकीतील जनतेचा काैल अाम्ही नम्रपणे स्वीकारताे. लाेकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च अाहे. कसब्याच्या विकासासाठी अाम्ही नेहमीच कटिबद्ध अाहोत. या निवडणुकीत सर्वस्व झाेकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अाभार व्यक्त करताे. ‘नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू’ यानुसार अागामी काळात अाम्ही वाटचाल करू. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे.
भ्रमातून कसबा बाहेर आला : ठाकरे कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.२) भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रभावातून कसबा बाहेर पडत असेल तर देश बाहेर पडायला काही हरकत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी माताेश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, एका चांगल्या बदलाची सुरुवात आहे. भाजपच्या विरोधातली मतांची संख्या वाढते आहे. ही एकत्र करणे मोठे आव्हान आहे. मतदार जागरूक होत चालले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र राहणे आणि कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘वापरा आणि फेका’ हे भाजपचे धोरण आहे. तेच पुण्यात झाले.
जनतेने निवडणूक हाती घेतल्याने माझा विजय : रवींद्र धंगेकर कसबा विधानसभा निवडणूक राज्यभरात प्रतिष्ठेची करण्यात आली होती. सदर निवडणुकीत सत्ताधारी त्यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापरही करण्यात आला. त्याचप्रमाणे मतदार संघात मोठ्या प्रमाणात त पैशांचा पाऊस पाडला गेला, मात्र जनतेने धनशक्ती विरोधात स्वतःच निवडणुक हाती घेऊन मतांचा पाऊस माझ्यावर पाडल्याने माझा विजय सुकर झाल्याची भावना विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.