आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीका:फडणवीस म्हणतात - महाराष्ट्र सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढतेय, भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीत कार्यकर्त्यांशी संवाद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘कोरोना साथीच्या हाताळणीमध्ये महाराष्ट्रात सरकार व प्रशासनाकडून गंभीर चुका होत आहेत. चाचणी कमी करून ही लढाई कदापिही जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे, असा इशारा देत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोनाशी नाही, तर आकडेवारीशी लढते आहे,’ असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र जनसंवाद’ या व्हर्च्युअल रॅलीस फडणवीस यांनी रविवारी संबाेधित केले. चक्रीवादळग्रस्तांना अजूनही शासकीय मदत पोहोचलेली नाही. ‘गावांत वीज नाही, असा दावा करून कापूस खरेदी होत नसताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पाठपुरावा केला. पण आघाडी सरकारने त्याचा लाभ घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला. आज ५० हजार उद्योगांना ४००० कोटींवर मदत दिली आहे,’ असे ते म्हणाले.

कर्तृत्वशून्य मंत्री
अनेक मंत्री केवळ केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानतात. त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. वीज बिले सावकारांप्रमाणे पाठवण्यात आली आहेत. अशा गलथान कारभाराने राज्यातली जनता त्रस्त आहे,’ असे फडणवीस म्हणाले.

0