आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी प्रकरणात संजय राऊतांचे प्रत्युत्तर:फडणवीसांनी आपल्या नेत्यांनाच शिवसेनेची भूमिका विचारावी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या सभेनंतर बाबरी प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अयोध्येतील बाबरी प्रकरणात तेव्हा शिवसेनेचा कोणताही नेता उपस्थित नव्हता, असे फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

राऊत म्हणाले, बाबरी प्रकरणात शिवसेनेची भूमिका काय होती हे त्यांनी आपल्या नेत्यांना विचारावे. महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई आणि चिनी घुसखोरीसारख्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हनुमान चालिसा आणि अयोध्येचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी रविवारच्या सभेत शिवसेनेवर हल्ला चढवत बाबरी आंदोलनातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हनुमान चालिसा म्हटल्याने राज्याच्या विरोधात कसा काय कट होतो, असा सवाल फडणवीस यांनी या सभेत केला होता.

बातम्या आणखी आहेत...