आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Fadnavis Vs Raut| Devendra Fadnavis Attacks State Government And Sanjay Raut On Flood Situations And Farmer Relief Package News And Updates

दौऱ्यांचे राजकारण:पूरग्रस्तांचे सांत्वन हा भाजपचा 'मुखवटा' असल्याचा राउतांचा टोला, फडणवीस म्हणाले- हे लोक ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झालेले

मुंबई / लातूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचे दौरे करत आहेत. परंतु, त्यांचे हे दौरे केवळ एक मुखवटा असल्याचा घणाघात शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर पलटवार करताना एसीत बसून मोठे झालेले नेते असा उल्लेख केला आहे.

मुखवटा घालून राजकारण साधले -शिवसेना
शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून विरोधी पक्षाच्या पूरग्रस्त भागांतील दौऱ्यांना एक मुखवटा म्हटले आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या निमित्ताने खरं तर त्यांना संवाद साधायचा होता. त्यासाठीच पूरग्रस्त भागांच्या सांत्वनाचा मुखवटा घातला. याच मुखवट्याच्या आड भाजपच्या नेत्यांनी राजकारण साधले.

पूर, दुष्काळ आणि अपघाताच्या ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते दौरे करतात. हा एक राजकारणाचा भाग असतो. संकटग्रस्त लोक आधीच भावूक असतात. त्यात विरोधक त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांच्या अश्रूंचे भांडवल करतात आणि सरकारवर निशाणा साधतात अशा शब्दांमध्ये सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे.

एसीत बसून मोठे नेते झालेले -फडणवीस
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचे दौरे करत असताना सोमवारी देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी शिवसेनेवर पलटवार केला. हे नेते ऑफिसच्या एसीत बसून मोठे झालेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? हे केवळ कागदांवरचे नेते आहेत. त्यांना उत्तर काय देणार! असे फडणवीस म्हणाले आहेत.

लातूर दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस
लातूर दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस

राज्यात अतीवृष्टी झाली. ओला दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात नाही. मुख्यमंत्री तर सोडाच पालकमंत्री सुद्धा पूरग्रस्तांची भेट घेत नाहीत. हे सरकार मराठवाडा आणि विदर्भ विरोधी आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना ही मदत मिळायला हवी असेही फडणवीस म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...