आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राइव्ह:एन्काउंटर स्पेशालिस्ट इसाक बागवानने बारामतीत जमीन घेऊन दाऊदच्या हस्तकाला विकली, नाव न घेता नवाब मलिकांनी मध्यस्थी केल्याचा गौप्यस्‍फोट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेल्या इसाक बागवान या पाेलिस अधिकाऱ्याने बारामतीमध्ये जमीन घेतली हाेती. ती जागा दाऊद संबंधित व्यक्तीला विकली आणि नंतर तीच जागा बक्षीसपत्र करून परत घेतली, त्यासाठी मुंबईतील एका नेत्याने मध्यस्थी केल्याचा गौप्यस्‍फोट करत त्या संदर्भातील एक पेनड्राइव्ह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दाखविला.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा विविध विषयांवर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले, विंदा करंदीकर यांची कविता सध्याच्या राजकारणावर भाष्य करते.

लोकांसाठी सरकार असते, याची थोडीही जाणीव दिसत नाही. कविवर्य विंदा करंदीकर यांची “सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ ही कविता वाचून दाखवली हाेते. तसेच पी. एल. बामनिया यांची कविता सध्याचे सरकार कसे आहे, याची जाणीव करून देते. “तुम चाहो तो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो’ ही कविता वाचून दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

साेलापुरातही एक वाझे आहे, ताे महिन्याकाठी ६० लाख गोळा करताे. ही रक्कम वरपर्यंत द्यावी लागते असेही सांगताे, बार्शीच्या राजा राऊत यांच्या प्रकरणाचा उल्लेख करून ते म्हणाले, त्यांच्या मुलाचा जीव धाेक्यात आहे. लोकप्रतिनिधी सभागृहात बोलले म्हणून पोलिस त्रास देणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. बारामतीतल्या जागेचा व्यवहार दाऊदच्या हस्तकासोबत केला. मुंबई पोलिस दलातील इसाक बागवान हे अधिकारी. त्यांनी बारामतीत जमीन संपत्ती गाेळा केली. ते एन्काउंटर स्पेशालिस्ट हाेते. त्यांच्या बंधूंनी एक तक्रार केली आहे. बारामती ते मुंबईपर्यंतच्या संपत्तीची यादी त्यात आहे. नोकरीत असताना इतरांच्या नावावर ती खरेदी केली. फरीद मोहम्मद अली याच्या नावाने खरेदी केली. तो दाऊदच्या संपर्कातील व्यक्ती. पुढे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मुलाकडून ती नंतर बक्षीसत्र करून घेतली. या प्रकरणात हस्तक्षेप करणारा मुंबईतील तो नेता कोण, असा सवाल करत नवाब मलिक यांच्याकडे अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश केला.

२४ महिन्यांत एकूण ३८ संपत्ती केल्या खरेदी
फडणवीस म्हणाले, “मंदिरे बंद होती, पण मदिरालये सुरू ठेवली, क्लास बंद होते. पण, ग्लास सुरू होते. कोरोनाने लोक मरत होते. पण यांनी २४ महिन्यांत ३८ संपत्ती खरेदी केल्या. भ्रष्टाचार किती बोकाळला याचे हे उदाहरण आहे. धुळ्यात एक लिपिक जिल्हा उपनिबंधकांना लाच मागतो, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...