आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलासा:7 महिन्यांपासून मुंबईत सुरू असलेल्या फेक टेलीफोन एक्सचेंजमध्ये 3 चीनी कंपन्यांचा सहभाग, एक लाखांपेक्षा जास्त फेक कॉल्स जम्मूला केले

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मिल्ट्री इंटेलिजेंससोबत मिळून या अवैध टेलीफोन एक्सचेंजचा भांडाफोड केला
  • याप्रकरणी अटक झालेल्या व्यक्तीकडून 191 सिम कार्ड्स आणि अनेक चीनी मशीन जप्त करण्यात आल्या आहेत

30 मे रोजी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मिल्ट्री इंटेलिजेंस यूनिटसोबत मिळून गोवंडी परिसरातील अवैध टेलीफोन एक्सचेंज रॅकेटचा भांडाफोड केला होता. आता याप्रकरणी चीनचा हात असल्याचे समोर आले आहे. तपासात हेदेखील समोर आले आहे की, हे फेक टेलीफोन एक्सचेंज 7 महीने चालला आणि यातून लाखो कॉल्स जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आले. क्राइम ब्रांचने याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली, त्याच्याकडून 191 सिम कार्डदेखील जप्त करण्यात आले आहेत.

चीनच्या तीन कंपन्या या नेटवर्कमध्ये सामील

क्राइम ब्रांचच्या तपासात हे समोर आले आहे की, या एक्सचेंजमध्ये पाकिस्तान किंवा दुसऱ्या देशातून येणाऱ्या इंटरनेट (वीओआयपी) कॉल्सला लोकल जीएसएम कॉलमध्ये बदलून फोन नंबरवर ट्रांसफर केले जात होते. सरळ शब्दात सांगायचे झाल्यास, परदेशातून भारतात कॉल केला, तर या एक्सचेंजमध्ये रिसीव करणाऱ्या नंबरवर भारतीय नंबरच दाखवत होता. तपासात समोर आले आहे की, या संपूर्ण नेटवर्कमध्ये चीनच्या तीन कंपन्या सामील होत्या. चीनच्या या कंपन्यानीच कॉल रूट करण्यासाठी वापरात येणारी उपकरणे, सिम बॉक्स आणि इतर तांत्रिक सपोर्ट पुरवला होता. आरोपीकडून पोलिसांनी अशी उपकरणे जप्त केली आहेत, जी परदेशातून येणाऱ्या कॉल्सला लोकल जीएसएम नंबरवर बदलल होते.

जम्मूच्या आर्मी ऑफिसमध्ये केला होता कॉल

मुंबई क्राइम ब्रांचचे संयुक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी यांनी सांगितले की, अवैध टेलीफोन एक्सचेंज चालवण्यासाठी चार सिम बॉक्सचा वापर केला जात होता. जप्त केलेल्या 191 सिम कार्डपैकी 72 अॅक्टिव होते आणि इतर 119 ला पुढील बॅकअपसाठी ठेवले होते. या एक्सचेंजमधून मोठ्या प्रमाणात महसुलला नुकसान पोहचले आहे. येथी जम्मूच्या काही सुरक्षा ठिकाणांवर कॉल करण्यात आली आहेत. या सिम बॉक्सोंमध्ये डायनामिक आयएमयआ सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...