आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक TRP केस:अंमलबजावणी संचालनालयानेही तपास सुरू केला, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यामध्ये गुन्हा केला दाखल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस यूनिटने आतापर्यंत या प्रकरणात 12 लोकांना अटक केली आहे

अंमलबजावणी संचालनालयाने बनावट टीआरपी प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी ईडीला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. मुंबई पोलिसांनी अनेक वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रेही ईडीकडे दिली आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर विभागाने (सीआययू) आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. यामध्ये रिपब्लिक टीव्ही चॅनलचे वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांचा समावेश आहे.

हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेसंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांकडून एका प्रकरणात जाब विचारला होता.

रिपब्लिक टीव्हीच्या 12 हून अधिक लोकांची चौकशी केली गेली आहे
घनश्याम सिंह यांची यापूर्वीही बर्‍याचदा चौकशी झाली आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंग हे केवळ वितरण प्रमुख नाहीत तर ते रिपब्लिक मीडिया नेटवर्कमधील सहाय्यक उपाध्यक्ष आहेत. केवळ घनश्याम सिंगच नाही तर टीआरपी प्रकरणात सीआययू रिपब्लिक टीव्ही वाहिनीतील अव्वल दर्जाच्या अर्धा डझनहून अधिक लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

इतर चॅनलचे कर्मचारीही चौकशीच्या फेऱ्यात
गेल्या महिन्यात CIU ने काही आरोपींच्या रिमांड अॅप्लीकेशनमध्ये ज्या काही चॅनलच्या मालक/चालकांना वॉन्टेड दाखवले होते, त्यामध्ये रिपब्लिक चॅनलचेही नाव होते. रिपब्लिक व्यतिरिक्त न्यूज नेशन, WOW, फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि महा मूव्ही चॅनल संबंधीत लोकही चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

आतापर्यंत दोन लोक बनले अप्रूव्हर
या केसमध्ये आतापर्यंत 12 लोकांना अटक झाली आहे. यामधून दोन आरोपी उमेश मिश्रा आणि आशीष चौधरी CIU चे अप्रूवरही बनले आहेत. CIU आतापर्यंत अनेकांचे स्टेटमेंट घेतले आहेत. अनेक साक्षीदारांचे CRPC च्या सेक्शन 164 नुसार मजिस्ट्रेट समोर जबाब घेतले आहेत. कारण खटल्याच्या त्यांनी पाठ फिरवू नये. ज्यांच्या घरांमध्ये बॅरोमीटर बसवण्यात आले होते त्यांचेही जबाबद नोंदवण्यात आले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser