आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक TRP केस:रेटिंग एजेंसी BARC च्या माजी COO ला मुंबई क्राइम ब्रांचने केली अटक, या केसमध्ये ही 14 वी अटक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिपब्लिक टीव्ही, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी चॅनलच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच टीमने कथित टीआरपी (टेलीव्हिजन रेटिंग पॉइंट) घोटाळा प्रकरणात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल (BARK) चे माजी COO (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) रोमिल रामगढिया यांना गुरुवारी अटक केली. फेक टीआरपी केसमध्ये ही 14 वी अटक आहे. यापूर्वी रिपब्लिक टीव्ही, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी चॅनलच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या एक-दोन वगळता जास्तीत जास्त जामिनावर आहेत.

क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, 'तपासादरम्यान टीआरपी केसमध्ये रामगढियांचा सहभाग आढळला होता, यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. रामगढ़िया यांना एका स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. येथून न्यायालयाने त्यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलिस कस्डटीमध्ये पाठवले आहे.' पोलिसांनी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी यांना टीआरपी घोटाळ्याच्या प्रकरणात रविवारी अटक केली होती. मात्र एका न्यायालयाने बुधवारी त्यांचा जामीन मंजूर केला.

रामगडिया यांची न्यायालयात याचिका
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान रोमिल रामगढिया यांच्या वतीने अ‍ॅड. मृन्मय कुलकर्णी म्हणाल्या की, (रोमिल) कोठडीत चौकशी करण्याची गरज नाही. रामगडिया यांनी कित्येक महिन्यांपूर्वी कंपनीतून राजीनामा दिला होता आणि कथित टीआरपी घोटाळ्याशी त्याचा काही संबंध नाही. बीएआरसी रेटिंग एजन्सीमध्ये रामगढियाची विशिष्ट भूमिका होती आणि कोणत्याही बेकायदेशीर कामात त्यांचा सहभाग नव्हता असा युक्तिवादही त्यांनी केला.

कोर्टात गुन्हे शाखेला सांगण्यात आले होते की रोमिलची अद्याप चौकशी होणे बाकी आहे, त्यामुळे विना कस्टडी हे शक्य नाही. ज्याचा कोर्टाने विचार केला आणि त्यांना 19 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser