आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा मोअर या!:राज्यभरात 70 हजार सार्वजनिक बाप्पांचे होणार विसर्जन, सर्वत्र पावसाचा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेडमध्ये पोलिसांकडून गणेश मंडळांना फुलांचे वितरण केले जाणार आहे. पोलिस ठाण्यात फुलांच्या पाकळ्या करताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
नांदेडमध्ये पोलिसांकडून गणेश मंडळांना फुलांचे वितरण केले जाणार आहे. पोलिस ठाण्यात फुलांच्या पाकळ्या करताना पोलिस कर्मचारी.

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या विघ्नानंतर यंदा निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असून शुक्रवारी (९ सप्टेंबर) राज्यात ७० हजार सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन होणार असून यासाठी लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होतील असा अंदाज आहे. मुंबईत १ लाख घरगुती बाप्पांना निरोप दिला जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष अ‌ॅड. नरेश दहीबावकर यांनी दिली.

दरम्यान, पुण्यातील मिरवणूक यंदा २५ तास, तर मुंबईतील मिरवणूक २४ तास चालेल, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत ७३ नैसर्गिक व १६२ ठिकाणी कृत्रिम विसर्जनस्थळी बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आली आहे. विसर्जनासाठी १० हजार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मनुष्यबळ कार्यरत ठेवले असून स्वराज्यभूमी येथून विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांद्वारे हाेणार आहे.

पोलिसांकडून फुलांचे वितरण

नांदेड: इतवारा भागाच्या हद्दीत संवेदनशील भाग आहे. श्रींच्या मिरवणुकीत गुलाल उधळताना धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत पोलिसांकडून ८१ गणेश मंडळांना पाच क्विंटल फुलांचे वितरण केले जाणार आहे. पोलिस ठाण्यात फुलांच्या पाकळ्या करताना पोलिस कर्मचारी.

सर्वत्र पावसाचा इशारा; मुंबईत १५ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त
राज्यासह मुंबईत ९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याने गणेशभक्तांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईत १२५०० सार्वजनिक गणेश मंडळे असून अडीच लाख घरगुती गणेशमूर्ती स्थानापन्न केल्या जातात. ६० टक्के घरगुती गणेशांचे विसर्जन झालेले आहे.

दगडूशेठ गणपती यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान

यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला असून गणेश भक्तांचा उत्साह दुणावलाय.

कोरोनांनतर यंदा गणेशभक्तांचा अभूतपूर्व उत्साह

-राज्यातील अनेक सार्वजनिक मंडळांत राजकीय नेत्यांचा यंदा पुढाकार होता. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा १२ शहरांत ३१४ ढोल पथके आपली कला सादर करणार -मंडळांकडून नाष्टा, चहा, पाण्याची सोय -अनेक मंडळांकडून भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंडळे करणार चहा, पिण्याचे पाणी, नाष्ट्याची सोय.

५० लाख भाविकांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

देशात लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देशासह विदेशातूनही भाविक येतात. यंदा सर्व निर्बंध उठल्याने दरदिवशी ५ ते ६ लाख याप्रमाणे नऊ दिवसांत ५० लाख भाविकांनी राजाचे दर्शन घेतले. राजकीय नेत्यांसह बॉलीवडूच्या सेलिब्रिटींनी राजाचे दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...