आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. यापूर्वी 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसा उसळली होती. आज शेतकऱ्यांनी 'चक्काजाम' आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांवर खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप केला जातोय. यावरुनच आता काँग्रेसने भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?' असा संतप्त सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे.
देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या #भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 6, 2021
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. हे कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ही मागर्णी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही दिल्लीच्या सीमेवरुन हलणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली सीमेवरील टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सरकार हे चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या 10-12 वेळा झालेल्या चर्चांमध्ये कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून शेतकरी विरोधीत सूर उमटताना दिसत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.