आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. आता या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटताना पाहालाय मिळत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच संजय राऊत आणि शरद पवार आता तुमची तोंड शिवली आहेत का? असा संतप्त सवालही आशिष शेलारांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, 'कधी काळी आवश्यक वाटल्यास शरद पवार फेसबुकवर पोस्ट टाकतात. मग कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही? पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही? आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केले आहे. मग काल हे सगळे घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता शिवली आहेत का?असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.
अरे कुठे फेडाल ही पापं…?
महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचे समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात ह्यांनी एक चकार शब्द देखील काढलेला नाही. मात्र महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरु लोकांचे समर्थन करण्यात आले. अरे कुठे फेडाल ही पापं…? असा सवाल आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत विचारला आहे.
महाविकास आघाडी अराजकता आणू पाहत आहे
आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. राजकीय सुडापोटी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अराजकता आणू पाहत असल्याचे शेलार म्हणाले आहेत. तसेच देशवासीय यांना सोडणार नाही. दिल्ली जवान असो वा दिल्ली पोलिस या सगळ्यांनी जो परमोच्च कोटीचा संयम दाखवलेला आहे. तो त्यांच्या पराकोटीच्या देशभक्तीचा नजारा होता. केंद्र सरकार आंदोलनाला ज्या संयमाने सामोरे गेले याविषयी त्यांचे कौतुक करायला हवे असेही आशिष शेलार म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.