आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर शेतकरी सुभाष देशमुख यांची प्राणज्योत मालवली:विधिमंडळ परिसरात रॉकेल अंगावर टाकून घेतले होते स्वत:ला पेटवून

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद येथील शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (56) यांनी विधिमंडळ परिसरात रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतले. त्यांचा आज सकाळी 11.45 वाजता मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत जे. जे. रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

45 टक्के जळाले होते

जे. जे. रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, 23 ऑगस्टला विधिमंडळाचे अधिवशन चालू असताना मंत्रालयात त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी ते 1 ते 3 डिग्री (45%) जळाले होते. त्यांना सीसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाला ज्वलन होते. सर्व प्रयत्न करूनही आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी घटना

विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ही घटना घडली. अधिवेशनावेळी शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुभाष देशमुख यांचा कौटुंबिक कलह होता, तो मिटवण्यासाठी ते प्रयत्नशिल होते. त्यांनी मंत्रालयाचे दारही त्यासाठी ठोठावले होते. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

घटनेचे विधीमंडळात पडसाद

सुभाष देशमुख यांनी आत्महदहनाचा प्रयत्न केल्यानंतर या घटनेची विधानभवनातही मोठे पडसाद उमटले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितले होते. या शेतकऱ्याला सर्व मदत केली, जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले होते.

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यावर शिंदे-भाजप सरकारचा भर आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. परंतु ऐन विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर शिंदे सरकारने भावनिक साद घालत पत्रही लिहेले होते. त्यात सुभाष देशमुख यांचा समावेश होता. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...