आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:अवकाळी अन् गारपीटीने नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही- अब्दुल सत्तार

ठाणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी आणि गारपीटीमुळे बळीराजाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, याबाबतचे आदेश कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास 82 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असेही सत्तार यांनी म्हटले आहे. ते ठाण्यात कृषी विभागाच्या बैठकीनंतर बोलत होते.

आंब्याचे मोठे नुकसान

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की,कोकणातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही ही दक्षता घेतली जाईल. अवकाळी पावसाने आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा नुकसान क्षेत्राबाबत पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर जवळपास 82 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. परंतु अजून ही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा पंचनामे केले जातील.

शेतकऱ्यांना लाभ देणार

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यसरकारकडून 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात आहे. महाराष्ट्रात नमो योजनेचा 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना आम्ही लाभ देणारे आहोत. शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक होणार नाही, यासाठी राज्य सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशील राहु असेही त्यांनी म्हटले आहे. कृषी विभागाकडून खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक तैनात असणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. शेतकऱ्यांचे जीवन कसे चांगले होईल यासाठी शिंदे सरकार प्रयत्न करत आहे. असे कृषीमंत्री सत्तार म्हणाले.