आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसान सभेचा लाँग मार्च आज मुंबईत धडकणार:सरकारशी चर्चेस नकार, म्हणाले- सामान्य माणूस सरकारला झुकवू शकतो हे दाखवून देणार

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन किसान सभेचा लाँग मार्च आज मुंबईत धडकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र आता मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावे, अशी भूमिका माजी आमदार जे. पी. गावित यांनी घेतली आहे.

आज आंदोलकांनी बैठकीत जाण्यास नकार दिला आहे. मोर्चा घेऊन मुंबईत जाणार मात्र चर्चेसाठी मंत्र्यांनी यावे, असे गावित यांनी म्हटले आहे. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला सरकारने प्राधान्य दिले, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

सध्या हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी गावात दाखल झाला आहे. घाटन देवीतून हा मार्च आज कसारा बायपासमार्गे पुढे प्रवास सुरु करणार आहे. काल या लाँग मार्चवरुन विधानसभेतही वातावरण तापलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, शेतकरी एवढ्या रणरणत्या उन्हात मोर्चा काढत आहेत. नाशिकवरुन ते पायी मुंबईच्या दिशेने चालत येत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ या मुद्यावर मार्ग काढावा.

काय आहेत मागण्या?

  • शेतमालाला योग्य भाव द्या.
  • कांद्याला 600 रुपयांचे अनुदान द्या.
  • नाफेडच्या माध्यमातून 2 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी करा.
  • दुधाला FRP धोरण लागू करा.
  • कसणाऱ्यांच्या ताब्यात असलेली वनजमीन त्यांच्या नावावर करा.
  • शेतीला लागणारी वीज दिवसा सलग 12 तास उपलब्ध करून द्या.
  • सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा पिकांचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवा.

या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.

मंत्री दादा भुसे म्हणाले की, किसान सभेच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला विविध खात्यांचे सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...