आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचे केंद्र सरकारला पत्र, म्‍हणाले:राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुग्धजन्य पदार्थांची परदेशातून आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल, असा इशारा देत निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. ६) केंद्र सरकारला लिहिले आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर आलेल्या लम्पी आजारामुळे देशातील दूध उत्पादन घटले आहे. दुसरीकडे देशामध्ये या पदार्थांची मागणी गेल्या वर्षभरात ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे सरकार दुग्धजन्य उत्पादनांची आयात करण्याच्या विचारात असल्याचे समजते, असे पवार म्हणाले.