आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज विविध राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृषी विधेयकाची अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेनंतर आंदोलकांनी कृषी बिलाच्या तिरडी पेटवली.
भाईंदर पश्चिमेच्या काँग्रेस भवनापासून सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेत सुमारे 25 जण काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याची घोषणाबाजी केली. गदारोळ वाढलेला पाहून पोलिसांनी 60 फूट रोडवर अंत्ययात्रा थांबवली आणि कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मोदी सरकार बिनकामाचे असून भांडवलदारांच्या हातात शेतकर्यांचे हित विकत असल्याचा आरोप काँग्रेस नेता दीप काकडे यांनी यावेळी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.