आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा बाण, कुणाची शान?:उद्या 'सुप्रीम' सुनावणी, ठरणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे भवितव्य; चार याचिकांवर होणार फैसला

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अत्यंत शिघेला पोहचला आहे, त्याची परिणीती म्हणून उद्धव ठाकरे सरकारवर राजीनाम्याची नामुष्की आली आणि शिंदेशाहीचा उदय झाला पण, त्यानंतरही ही 'अ'राजकता थांबली नसून आमदारांची अपात्रता आणि शिंदे सरकारला आव्हान देत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल केल्या त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय भवितव्याचा फैसला ठरणार आहे.

या आहेत त्या चार याचिका

  • 1) एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान
  • 2) राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
  • 3) शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
  • 4) एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप

राज्यात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच ईडीचा ससेमिरा लागलेल्या शिवसेना नेत्यांनी पक्षांतर सुरु केले. अशातच संजय राऊत यांनाही अटक झाली. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. आधी उद्धव सरकार तरते की, गडगडते याकडे लक्ष लागून राहीलेल्या जनतेला आता शिंदेशाही स्थिरावते की, कोसळते याचीही उत्सुकता आहे. त्याचाच उद्या फैसला होणार आहे.

घडामोडी

  • सर्वोच्च न्यायालयात एकूण चार याचिकांवर सुनावणी.
  • 16 आमदारांच्या अपात्रतेवरही उद्याच सुनावणी .
  • शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली.
  • शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या.

तर शिंदे सरकार कोसळू शकते...

आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते, असे जाणकार सांगत आहेत. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्याचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले. उद्याचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. तर निकालानंतर शिवसेनेचे अस्तित्वावरील प्रश्नावरही उत्तरे मिळणार आहेत.

घटनापीठावरही निर्णय?

शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली. यात शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या, असे शिंदे गटाने याचिकेत म्हटले. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट घटनापीठाची स्थापना करणार का? अथवा वेगळा आदेश मिळतो का? हेही समजेल. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह आमदारांचा उद्या फैसला

एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार, तानाजी सामंत, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे. यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या संदर्भात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णयाची शक्यता असून उद्या या आमदारांचा फैसला होईल.

बातम्या आणखी आहेत...