आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औषध:कोरोना उपचारासाठी फेविपिराविरला डीजीसीआयने दिली मंजुरी; 'फेबीफ्लू’ नावाने मिळेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका गोळीची किंमत 103 रुपये
Advertisement
Advertisement

कोरोनाची हलकी आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी फेव्हिपिराव्हिर औषधाच्या वापराला ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाची (डीजीसीआय) मंजुरी मिळाली आहे. ही माहिती औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकलने बीएसई आणि एनएसईला लेखी दिली आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकलने म्हटले आहे की, ती भारतातील पहिली औषधी कंपनी आहे जिला डीजीसीआयने फेविपिराविर औषधाचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ते बाजारात “फेबीफ्लू’ नावाने उपलब्ध होईल. एका गोळीची किंमत १०३ रुपये ठेवण्यात आली आहे. या आधी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (सीआयआय) कोराेनाची लस लवकरच आणण्याची घोषणा केली आहे. या लसीची अंदाजे किंमत एक हजार रुपये आहे. ग्लेनमार्कच्या उपाध्यक्षा डॉ. मोनिका टंडन यांनी सांगितले की, फेव्हिपिराव्हिर औषधाच्या उत्पादनात लागणारा कच्चा माल देखील कंपनी स्वत: तयार करेल. टंडन यांनी सांगितले की, औषधाची वैद्यकीय चाचणी करण्याची विनंती आम्ही ४ एप्रिलला डीजीसीआयला केली होती. एप्रिल अखेरीस परवानगी मिळाली. त्यानंतर सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचे पालन करत आम्ही मे महिन्यात चाचणी सुरू केली. फेविपिराविर औषधावर चीन, रशिया आणि जपानमध्ये संशोधन झाले आहे.

Advertisement
0