आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे पत्र:केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्याने शरद पवारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी, केंद्राला लिहिले पत्र

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी केंद्रीय मंत्री गौडा यांना पत्र लिहिले.

केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी खतांच्या दरवाढीवर नाराजी व्यक्त केली. आधीच शेतकऱ्यांसमोर संकट आहे, या काळात खतांच्या किंमतींमध्ये वाढ करणे योग्य नाही. ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्राला पत्रच लिहिले आहे. केंद्रीय रसायने व खते मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे त्यांनी खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी केंद्रीय मंत्री गौडा यांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी खतांच्या दरवाढीचा विरोध केला आहे. त्यांनी सध्याच्या कोरोना काळामध्ये शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. असे असताना केंद्राने केलेली खत दरवाढ ही धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणीही शरद पवारांनी केली आहे. पुढे त्यांनी लिहिले की, या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार व्हावा व दरवाढ मागे घेण्यात यावी.

पुढे पत्रात शरद पवारांनी लिहिले की, देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेचा सर्वांनाच तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती भीषण आहे. असे असताना शेतकऱ्याच्या समस्यांकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. मात्र असे असताना या उलट काम केंद्राकडून केले जात आहे. बळीराजाला मदतीचा हात देण्याऐवजी केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांत भर घालण्याचे काम केले असल्याचे म्हणत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...