आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषअबब, तब्बल 156 खासदार घराणेशाहीतून:लोकसभा निवडणुकीत 66 टक्के उमेदवार एकाच घरातले

अनिल जमधडे2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांतील 66 टक्के उमेदवार हे घराणेशाहीचे होते. त्यातही पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात घराणेशाहीची स्थिती भीषण म्हणावी अशी आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील 20 मतदारसंघात घराणेशाही पार्श्वभूमी असलेले एकूण 19 उमेदवार होते. म्हणजे जवळपास सर्वच मतदारसंघांत सत्तेसाठी घराणेशाहीचे उमेदवार स्पर्धेत होते. विशेष म्हणजे यातील निम्मे उमेदवार हे भाजप-शिवसेना युतीचे होते. तर, निम्मे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे होते. म्हणजेच युती व आघाडीने अगदी समान प्रमाणात घराणेशाहीचे उमेदवार दिले होते.

सर्वपक्षीय वैशिष्ट्य

वरील आकडेवारीवरुन लक्षात येते की महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 32 मतदारसंघांत घराणेशाहीचे उमेदवार होते. विशेष म्हणजे यातील निम्मे उमेदवार युतीने दिले होते. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 38 टक्के उमेदवार हे घराणेशाहीतले आहेत. तर, काँग्रेसमध्ये हे प्रमाण २६ टक्के आहे. शिवसेनेत हे प्रमाण 30 टक्के आहे. तर, राष्ट्रवादीचा आकडा सर्वाधिक 59 टक्के इतका आहे. मात्र, घराणेशाहीवरुन काँग्रेसवर सातत्याने टीका केली जाते, त्या काँग्रेसपेक्षा भाजपची घराणेशाही जास्त आहे. त्यामुळे घराणेशाही हे आता सर्वपक्षीय वैशिष्ट्य बनल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीचे उमेदवार दिल्याने निवडणुकीत घराणेशाही हा मुद्दा बनत नाही.

विशेष म्हणजे या उमेदवारांच्या कुटुंबामध्येही पूर्वी कुणी आमदार किंवा खासदार होते की नाही, ऐवढाच निकष घराणेशाहीसाठी वापरला आहे. उमेदवारांची सहकारी, खासगी कारखाने तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीतील कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली असती तर घराणेशाहीतून समोर आलेल्या उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली असती.

2019 लोकसभा निवडणुकीतील प्रमुख 11 मतदारसंघातील घराणेशाही

मतदारसंघखासदाराचे नावपक्षघराणे
माढारणजितसिंग नाईकभाजपमाजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचा मुलगा
संजयमामा शिंदेराष्ट्रवादीभाऊ बबन शिंदे आमदार
कोल्हापूरसंजय मंडलिकशिवसेनावडील सदाशिवराव मंडलिक खासदार
धनंजय महाडिकराष्ट्रवादीकाका महादेव महाडिक
हातकणगलेधैर्यशिल मानेशिवसेनाआजोबा व आई खासदार
सांगलीसंजयकाका पाटीलभाजपदिनकर बापू काका आमदार
विशाल पाटीलस्वाभिमानीकाका मदन पाटील मंत्री व भाऊ प्रतिक पाटील खासदार
साताराउदयनराजे भोसलेभाजपकाका अभयसिंगराजे भोसले
नरेंद्र पाटीलशिवसेनावडील अण्णासाहेब विधानपरिषद सदस्य
पार्थ पवारराष्ट्रवादीवडील उपमुख्यमंत्री व आजोबा माजी मुख्यमंत्री
बारामतीसुप्रिया सुळेराष्ट्रवादीवडील मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री
काचंन कुलभाजपसासरे, सासू व पती माजी आमदार
अहमदनगरसुजय विखेभाजपवडील मंत्री, आई जिल्हा परिषद अध्यक्ष
संग्राम जगतापराष्ट्रवादीवडील अरुणकाका जगताप आमदार
जालनाविलास औताडेकाँग्रेसमाजी आमदार केशवराव औताडे यांचा मुलगा
बीडप्रतीम मुंढेभाजपवडील उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री
परभणीराजेश विटेकरराष्ट्रवादीवडील आमदार
उस्मानाबादओमराजे निंबाळकरशिवसेनावडील आमदार व पवार घराण्याशी नाते
राणा जगजितसिंगराष्ट्रवादीवडील पद्मसिंग पाटील माजी मंत्री

राजकारणात कोणत्या घराण्याची कितवी पिढी

 • पुण्यात शरद पवारांची तिसरी पिढी
 • सांगतील वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी
 • साताऱ्यात भोसले घराण्याची तिसरी पिढी
 • सोलापुरात मोहिते पाटलांची तिसरी पिढी
 • सुशीलकुमार शिंदे यांची दुसरी पिढी
 • अहमदनगरमध्ये विखे पाटलांची तिसरी पिढी
 • नगरमध्येच थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी
 • कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी
 • नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी
 • जळगावात जैन यांची पिढी
 • विदर्भात नाईकांची दुसरी पिढी
 • मराठवाड्यात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी
 • गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी
 • कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी
 • नारायण राणेंची दुसरी पिढी
 • अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी
 • मुंबई-ठाणे पट्ट्यात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी

देशात 156 खासदार घराणेशाहीतून

मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ५४३ पैकी १५६ खासदार हे कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीतून आले होते. त्यात एकट्या काँग्रेसचे 208 पैकी 78, राष्ट्रीय लोकदलाचे ५ पैकी ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ पैकी ५, बिजू जनता दलाचे १४ पैकी ६, बसपाचे २१ पैकी ७, समाजवादी पक्षाचे २२ पैकी ६, माकपचे १६ पैकी ४ आणि भाजपचे ११६ पैकी २२ खासदार हे राजकीय घराण्याच्या पार्श्वभूमीचे होते. या पक्षांमधील घराणेशाहीच्या प्रमाणाची टक्केवारी काढल्यास अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल प्रथम, राष्ट्रवादी काँग्रेस द्वितीय आणि काँग्रेस तृतीय क्रमांकावर आहे.

निवडणूक सुधारणांची गरज

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी घराणेशाहीबाबत सांगितले की, लोकशाहीचा प्रवाह मोकळेपणाने प्रवाही होण्यासाठी घराणेशाहीचे राजकारण नष्ट होऊन नेतृत्वाची संधी सामान्य कार्यकर्त्याला मिळायला हवी. विरोध घराण्यांना नाही तर त्यामुळे लोकशाहीतील नेतृत्वाची संधी सर्वांना नाकारली जाते हा खरा मुद्दा आहे. तसेच, घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करताना निवडणूक सुधारणांविषयीही बोलावे लागेल. अन्यथा घराणेशाहीच्या मतदारसंघात नेत्याऐवजी सामान्य कार्यकर्ता उभा केला तर तो कोटी रुपये कसे उभे करणार हा प्रश्न आहे. निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत व्हावी, अशी निवडणूक सामान्य कार्यकर्त्याच्या आवाक्यात आली पाहीजे, यावरही काम करायला हवे.

बातम्या आणखी आहेत...